माणुस
भीकाऱ्याच्या झोपडीला सरकारी जागा,
कचरा फेका रस्त्यावरती, हवे तीथे हागा!
दारु प्या, चालवा गाडी, उडवा दोन-चार,
नगरसेवक भाऊ पाठी, त्याचे सतरा बार!
सिग्नल नुसते रंगीत लाइट, त्याला अर्थ नाय,
गाड्यांसाठी असतात रस्ते, ठेवता कुठे पाय?
घाई तर इतकी असते, सांगा म्हनती कसे थांबू?
पन यांची फाटते जेव्हा मामा देतो बांबू!
डोळे काढून बघत असतो, हर गोरी का रूप!
आईटी मधे बरी असते जवानी की धुप!
रात्री क्याब मधे नुसते फीरत असतात बलात्कारी,
कोर्टात केसेस पडुन इतक्या, ह्यांची कव्हा बारी?
असा माझा देश त्याला संस्कारांची नशा,
बेतुक म्हणे ऐका बुवा दाम्भिकाची भाषा!
-Rameshwar 'Betuk' Sabde
1 Comments:
sunder.. mee premat padalo tujhya mitra...
एक टिप्पणी भेजें
<< Home