<body><script type="text/javascript"> function setAttributeOnload(object, attribute, val) { if(window.addEventListener) { window.addEventListener("load", function(){ object[attribute] = val; }, false); } else { window.attachEvent('onload', function(){ object[attribute] = val; }); } } </script> <iframe src="http://www.blogger.com/navbar.g?targetBlogID=19828333&amp;blogName=%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE+%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87+%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6&amp;publishMode=PUBLISH_MODE_BLOGSPOT&amp;navbarType=BLUE&amp;layoutType=CLASSIC&amp;searchRoot=http://waabuaa.blogspot.com/search&amp;blogLocale=hi_IN&amp;homepageUrl=http://waabuaa.blogspot.com/&amp;vt=-6488738705712143857" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" height="30px" width="100%" id="navbar-iframe" allowtransparency="true" title="Blogger Navigation and Search"></iframe> <div></div>

2008-05-01

मेंदुची कविता

मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!

फ़ाटक्या कानाला वाळे नवे,
लहान माशीला जाळे नवे,
म्हणे माझा मेंदु मोठा,
खल्लास करेल शकिल छोटा!

मेंदु करी गप्पा मोठ्या,
मेंदुपरी गोट्या मोट्या,
म्हशीपुढे गोट्या छोट्या,
म्हशीलाही भारी कठ्या!

बेतुक म्हने कळाले बेट्या,
ऊघडु नको तुझ्या पेट्या!

- Sabdeshwar, Betuk

2007-08-30

माणुस

भीकाऱ्याच्या झोपडीला सरकारी जागा,
कचरा फेका रस्त्यावरती, हवे तीथे हागा!
दारु प्या, चालवा गाडी, उडवा दोन-चार,
नगरसेवक भा‌ऊ पाठी, त्याचे सतरा बार!

सिग्नल नुसते रंगीत ला‌इट, त्याला अर्थ नाय,
गाड्यांसाठी असतात रस्ते, ठेवता कुठे पाय?
घा‌ई तर इतकी असते, सांगा म्हनती कसे थांबू?
पन यांची फाटते जेव्हा मामा देतो बांबू!

डोळे काढून बघत असतो, हर गोरी का रूप!
आईटी मधे बरी असते जवानी की धुप!
रात्री क्याब मधे नुसते फीरत असतात बलात्कारी,
कोर्टात केसेस पडुन इतक्या, ह्यांची कव्हा बारी?

असा माझा देश त्याला संस्कारांची नशा,
बेतुक म्हणे ऐका बुवा दाम्भिकाची भाषा!

-Rameshwar 'Betuk' Sabde

2007-05-21

झोपेवर बोलु काही: खंड एक, अध्याय द्वितीय

खरा ज्ञानी तो निघला,
बुआ झाला नि झोपी गेला,
आमच्या सारख्या शहाण्याला,
परि झोप कुठे?

अती कष्टं प्राणी घेयी,
ऑफिस मध्ये सदोदित,
थकुनी घुसे गोधडित,
परि झोप कुठे?

बायको त्याची तरणी-ताठी,
ह्याची विशीतच साठी,
पडे बायको त्याच्या पाठी,
परि झोप कुठे?

असा जीव वैतागलेला,
जगच उठले खावयाला,
जागतीला बांधलेला,
मग झोप कुठे?

2007-05-05

वि-स्मरण्ण

वि-स्मरण्ण

होते जीवन ऐसे की नको झला तो जन्म
भोवतालची दुखे बघता, मन हो‌ई खिन्न

आली माझ्या जीवनात एक रशी‌अन प्रसन्न
आशा दिसली मजला कारण भाव तीचा छपन्न

बापाचा चुलत्या वारला ठे‌ऊन लाख एकावन्न
आता नव्हती चिंता करण पोट भर मिळे रम्म

इराण्याचे हाटेल दिसले, त्यात चहा बन्न
रित्या अस्तित्वाचा विचार झाला छिन्न-विछिन्न

फिरत होतो शोध घेत वास हा खमंग
हाटेल कोल्हापुर दिसले, खालले भाकरी-चिकन्न

दोन बांबुवर हा तंबु, एक आहे अन्न
दुसरी कला अवगत करतोय, नाव तिचे विस्मरण्ण

खाणे-पीणे-वीणे, मार्ग नाही हा कठीण्ण
डोक्यला शॉट नको, मन करा रे प्रसन्न

शीघ्र कवी,
tmww

वा बुआ..... चालुद्या

2006-10-31

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिहाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

- बा.सी.मर्ढेकर

2005-12-16

ऊपेग?

देहिं ज्याच्या नाहि,
सात्विकाचे गुणं,
आगादा कामून,
करा बा?

कहाले बसावे,
मंदिराच्या दारीं,
कहाले ऊपाशी,
मरा बा?

कशापाई प्राणी,
करि आटापिटा,
कहाले जपाची माळ,
धरा बा?

मिका म्हणे ज्याला,
ऊपेग ना कशाचा,
तो आपल्या घरीच,
बरा बा!

2005-12-13

कशापाई खटाटोप मांडलान संसारी ?

आज दुपारी काम सोडुन पारावर बिडी वढत बसलो असता, वाईच मनात इचार आला कि जगात जे काय चाललय ते लई बरं चाललया! आपल्या तुकाराम म्हाराजान्नी ज्या टावळान्ची मरेपत्तुर तासली ते तर सोसायटीच्या समध्या शेत्रात माघं दिसताती! कायतरी कराया पायजेल. म्हुन हा ऊद्योग!